Posted in कविता - Kavita - કવિતા

शाळेत बाई म्हणाल्या : आपल्या
आवडत्या विषयावर निबंध लिहा..
एका मुलाने बघा किती सुंदर निबंध लिहिला…
विषय –
दगड

‘दगड’ म्हणजे ‘देव’ असतो..
कारण तो आपल्या आजूबाजूला
सगळीकडे असतो.. पाहीलं तर दिसतो..

अनोळख्या गल्लीत तो
कुत्र्यापासून आपल्याला वाचवतो..

हायवे वर गाव
केव्हा लागणार आहे ते दाखवतो..

घराभोवती कुंपण बनून रक्षण करतो..

स्वैयंपाक घरात
आईला वाटण करून देतो..

मुलांना झाडावरच्या
कैऱ्या, चिंचा पाडून देतो..

कधीतरी आपल्याच डोक्यावर बसून
भळाभळा रक्त काढतो आणि
आपल्या शत्रूची जाणीव करून देतो..

माथेफिरू तरुणांच्या हाती लागला तर,,
काचा फोडून त्याचा राग शांत करतो..

रस्त्यावरच्या मजुराचं
पोट सांभाळण्यासाठी
स्वत:ला फोडुन घेतो..

शिल्पकाराच्या मनातलं
सौंदर्य साकार करण्यासाठी
छिन्निचे घाव सहन करतो..

शेतकऱ्याला
झाडाखाली क्षणभर विसावा देतो..

बालपणी तर स्टंप, ठिकऱ्या, लगोरी अशी
अनेक रूपं घेऊन आपल्याशी खेळतो..

सतत आपल्या मदतीला
धावून येतो, ‘देवा’सारखा..

मला सांगा,,
‘देव’ सोडून कोणी करेल का
आपल्यासाठी एवढं ??

बाई म्हणतात –
तू ‘दगड’ आहेस,, तुला गणित येत नाही..
आई म्हणते –
काही हरकत नाही,,
तू माझा लाडका ‘दगड’ आहेस..
देवाला तरी कुठे गणित येतं ! नाहीतर
त्याने फायदा-तोटा बघितला असता..
तो व्यापारी झाला असता.”

आई म्हणते –
दगडाला शेंदुर फासून
त्यात भाव ठेवला की,
त्याचा ‘देव’ होतो ~

म्हणजे, ‘दगड’ च ‘देव’ असतो ~

Author:

Buy, sell, exchange old books

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s