Posted in हिन्दू पतन

*औरंगजेबाने हिंदूंवर केलेली दडपशाही व हिंदूंच्या धर्मांतरासाठी केलेले कपट कारस्थान*

औरंगजेब जसा सत्तेवर आला तसा त्याने इस्लामच्या प्रसारासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले व गैरमुसलीम लोकांवर अन्याय अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्याने सर्वात आधी काफिरांवर आर्थिक दडपण आणायला सुरुवात केली.

➡️10 एप्रिल 1665 रोजी औरंगजेबाने एक वटहुकूम काढला, त्यानुसार विक्री करता आणलेल्या सर्व वस्तूंवर मुसलमानांना अडीच टक्के तर *हिंदूंना पाच टक्के* जकात कर देणे निश्चित केला. 1670 मध्ये मुस्लिमांना या करातून पूर्णपणे मुक्त करण्यात आले परंतु हिंदूंवर पाच टक्के कर कायम ठेवला. त्यामुळे हिंदू व्यापाऱ्यांना मुसलमान व्यापाऱ्यांशी संगनमत करावे लागले.

➡️ काफिरांवर *आर्थिक दडपण* आणण्यासाठी धर्मांतर केलेल्या व्यक्तींना द्रव्याच्या (पैशाच्या) स्वरूपात बक्षीस देणे, सार्वजनिक सेवेत मोठमोठ्या जागा देणे, तुरुंगातून मुक्ती देणे किंवा विवादित मालमत्तेचा वारसा हक्क मिळवून देणे अशा योजना केल्या. त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या हिंदूंना धर्मांतरासाठी प्रवृत करण्यात आले.

➡️1661 मध्ये सरकारी मालकीच्या जमिनीतल्या शेतीचा *शेतसारा वसूल* करणारा अधिकारी मुसलमानाचा असले पाहिजे असा वटहुकूम जारी करण्यात आला.

➡️सर्व सुभेदारांनी आणि तालुकादारांनी आपल्या पेशकरांना (लिपिक) आणि लेखापालांना (दिवाण) नोकरीतून काढून टाकावे आणि त्यांच्या जागी *मुसलमानांच्या नेमणुका* कराव्यात असा हुकूम अमलात आणण्यात आला.

➡️हिंदू पेशकारांना नोकरीतून वगळण्यात आल्याने राज्य आखणी कठीण असल्याचे लक्षात आल्यावरही काही ठिकाणी हिंदू करोरींच्या जागी मुसलमान अधिकाऱ्यांना नेमण्यात आले.

➡️काही *धर्मांतर केलेल्या व्यक्तींची* बादशहाच्या खास आदेशावरून दिल्ली शहरातून बँडच्या निनादात आणि विजयी ध्वज लावून हत्तीवरून खास मिरवणूक काढण्यात येत होती इतरांना दैनंदिन भत्ता मिळत असेल हा कमीत कमी चार आण्याचा भत्ता असे.

➡️मार्च 1695 मध्ये राजपूत वगळता इतर सर्व हिंदूंना पालखीत बसण्यास हत्तीवर किंवा घोड्यावर स्वार होण्यास मनाई करण्यात आली. जवळ शस्त्र बाळगण्यासही त्यांना बंदी घालण्यात आली.

➡️वर्षभरातील काही शुभ दिवशी भारतातील हिंदू त्यांच्या तीर्थक्षेत्रांच्या जागी यात्रा भरवीत असत. अशावेळी या संख्या स्त्री पुरुष आणि मुले एकत्रित जमत. या ठिकाणी दुकानदार आपले दुकाने थाटून आपल्या वस्तू विकत असत व एकमेकांना भेटून लोक आनंद व्यक्त करत. त्यामुळे औरंगजेबाने संपूर्ण राज्यात अशा यात्रा भरवण्यास 1668 मध्ये बंदी घातली.

➡️एवढेच काय तर *दिवाळी आणि होळी* यासारखे हिंदूंचे प्रमुख सण ज्या ठिकाणी बाजार भरतो त्याच्या हद्दीबाहेर साजरी करावेत असाही हुकुम त्याने काढला होता.

यावरून औरंगजेब किती *धर्मांध मुसलमान* होता व इस्लामच्या प्रसारासाठी किती छळ कपट करत होता हे दिसून येते. हिंदूंचा आनंद हिरावून घेऊन त्यांना दुःखाच्या गर्तेत ढकलायचे आणि सुखी आयुष्य जगायचे असेल तर इस्लामचा मार्ग स्वीकारायचा असे प्रलोभनच त्याने ठेवले होते. यामुळे तत्कालीन समाजातील शेतकरी, कष्टकरी, दलीत, बहुजन तसेच व्यवसाय व व्यापार करणारा मोठा वर्ग इच्छा नसताना धर्मांतराच्या आहारी गेला.

संदर्भ: औरंगजेब, लेखक – जदुनाथ सरकार, पृष्ठ क्र. 160, 161
=============

Unknown's avatar

Author:

Buy, sell, exchange old books 8369123935

Leave a comment