नशेत टुण्णं झालेले चंदू भाउ घराकडे चालले होते.
वाटेत चायनीजची गाडी दिसली. ते गाडीवर गेले अन् म्हणाले “एक प्लेट चिकन चिली दे.”
गाडीवाला म्हणाला “चिकन आता रेडी नाही. आणि आता खुप उशीर ही झालाय. गाडी बंद करायची वेळ झालीच. कच्चं शिल्लक आहे ते देऊ का ? “
चंदूने विचार केला घरी गेल्यावर बायको बनवेल.
त्यांनी होकार दिल्यावर गाडीवाल्यानी एक किलो चिकन प्लास्टिक बॅग मध्ये टाकून ती बॅग चंदूच्या हातात दिली.
चंदू घराजवळ आल्यावर गल्लीतली कुत्री त्यांच्यावर भुंकू लागली. चंदू ही त्यांना शिव्या देऊ लागले.
तेव्हा एक मोठा कुत्रा त्यांच्यासमोर आला पण तो न भुंकता फक्त त्यांच्याकडे फक्त पहात उभा राहिला होता.
चंदू हे त्यांच्याकडे पाहून म्हणाले “तू एकदम चांगला कुत्रा आहेस. इतर कुत्र्यासारखं तू माझ्यावर भुंकला नाहीस. तूला चांगल्या माणसाची पारख आहे. तुझी अन् माझी खुप जमेल. मी तुझ्यावर खुश झालो आहे. हे घे चिकन खा.”
असं म्हणत हातातल्या बॅग मधलं सर्व चिकन त्यांनी त्या कुत्र्याच्या समोर टाकलं.
कुत्रा ते खाऊ लागला तर बराच वेळ चंदू हे प्रेमानी त्याच्या पाठीवर हात फिरवत होते.
नंतर ते घराकडे निघाले…
घरी पोहोचल्यावर बायकोनी जे ताटात वाढून आणून दिलं ते गुपचुप खाल्लं आणि झोपून गेले.
इकडं चंदूच्या बायकोनी दुपारीच ऐकलं होतं की गावात एक बिबट्या आला असून सायंकाळी तो एका घरात ही शिरला होता.
बऱ्याच लोकांनी त्याला पाहिलं होतं.
म्हणून ती आपल्या नवऱ्याच्या काळजीत होती. पण नवरा सुरक्षित घरी आलेला पाहून तिने देवाचे आभार मानून आता ती ही झोपण्याच्या तयारी करू लागली…
तोच मुलांच्या मोबाईल वर एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्याला कैप्शन होतं की
आपल्या गल्लीतला सूपर हिरो…
मूलानी तो व्हिडिओ आपल्या आईला दाखवला.
बिबट्याला चिकन खाऊ घालत, वरून त्यांच्याच पाठीवरून हात फिरवत असलेल्या आपल्या नवऱ्याला पाहून ती बिचारी बेशुद्ध पडली.
हिच तर खरी ताकद असते दारूची…
३१ डिसेंबरच्या रम्य आठवणी…