ुन तर त्याला रडूच कोसळले.
त्याने ती सर्व घटना सरपंच व ग्रामसेवकाला सांगितली. त्यांना नवलही व आनंदही वाटला. त्यांनी वाहकाला ठरल्या तारखेला त्या गांवी येण्याचे आमंत्रण दिले.
वाहक महादू वेंगुर्लेकर गावात आले तर शेकडो ग्रामस्थ जमलेले. सरपंचाने त्यांच्या गळ्यात फुलाचा हार घातला. वाजतगाजत त्याला गांवाच्या ग्रामपंचायत कार्यालयात नेले. तेथे सर्वजन विराजमान झाल्यावर तो शेताचा व घराचा नावावर करण्याचा कागद व म्हातारीने दिलेले अडीच तोळे सोने त्याच्या समोर ठेवले.
महादू वेंगुर्लेकरच्या डोळ्यातुन अश्रुच्या धारा लागल्या.
मी केलेल्या एका छोटयाश्या मदतीची म्हातारी एवढी किंमत देवुन गेली. त्याला काहीच सुचत नव्हते.
बाजुलाच मुलांचा गलका त्याला ऐकु येत होता. त्याने विचारले, ‘येथे शेजारी हायस्कुल भरते का?’
सरपंचाने, ‘हो, शाळेला स्वतःची जागा व इमारत नाही. त्यामुळे कातवन ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या तोडक्या मोडक्या खोल्यांमध्ये वर्ग भरतात.’ असे सांगितले.
वाहक म्हणाला,’का?गावठाणची जागा किंवा जवळपासच्या एखाद्या शेताचा तुकडा नाही का कोनी देत शाळेसाठी?’
सरपंच म्हणाले, ‘गांवठाणची जागा नाहीच व शेत देण्यास कोणीच तयार होत नाही.’
वाहक महादू वेंगुर्लेकर ताडकन खुर्चीवरुन उठले व टेबलावरील शेताचा कागद सरपंचाला देत म्हणाले, “हे घ्या शाळा बांधण्यासाठी शेत. हे घर पण विक्री करा. त्यातुन येणारे पैसे बांधकामाला वापरा आणि हे सोने हे विकून शाळेला छान दरवाजा बांधा व त्यावर म्हातारीचे सुंदर नांव टाका”
टाळ्यांचा कडकडाट झाला. सरपंच व ग्रामस्थ भारावून गेले. “दरवाज्यालाच काय हायस्कुलला म्हातारीचे नांव देवू”
वाहक महादू वेंगुर्लेकर यांनी त्यांचे आभार मानून निरोप घेतला. त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे सारा गाव बघतच राहिला.
झोळी फाटकी असुन सुद्धा गांवाचे सारे काही तो गांवालाच देवून गेला होता व एक प्रकारे त्या म्हातारीच्या नावाला अमर करून गेला.
एखाद्याला केलेली छोटीमोठी मदत कधीही वाया जात नाही. त्याच्या काळजात ती घर करुन जाते. समोरचा कृतघ्न झाला तरी चालेल पण आपण मदत करण्याचा स्वभाव कधीच सोडू नका.
माणसाने माणसांशी माणुसकीने वागावे हे विस्मृतीत जाऊ नये म्हणून अशा पोस्ट परत परत एक मेकांना पाठवत राहू.