एका ख्रिश्चन धर्म प्रसारकाला आसाम मध्ये पाठवलं होतं.! नाव फादर क्रूज.! त्याला आसाम मधल्या एका प्रभावशाली कुटुंबाच्या मुलाला इंग्रजी शिकवायची संधी मिळाली.!
पाद्री साहेब हळू हळू चौफेर नजर फिरवू लागले. ते म्हणतात ना, ‘हातभर गजरा आणि गावभर नजरा..’ तस..!
त्यांच्या लक्षात आलं की त्या मुलाची आजी ही घरातली सगळ्यात प्रभावशाली व्यक्ती आहे.! तिला जर आपण आकाशातल्या बापाच्या शिकवणुकीत पकडलं तर हे कुटुंब आणि नंतर सगळं गाव आपण ख्रिश्चन बनवू शकतो..!
आनंद कुलकर्णी
मग पाद्री साहेब हळू हळू आजीला सांगायला लागले की कस प्रभू येशू हा कुष्ठरोग बरा करतो, आंधळ्याना कशी दृष्टी देतो.! वगैरे, वगैरे…! ह्यावर त्या आजी त्याला म्हणाल्या, पोरा, आमच्या श्रीराम आणि श्रीकृष्ण ह्यांच्या चमत्कारासमोर हे तर काहीच नाही.! आमच्या प्रभू श्रीरामांनी एका दगडाला नुसता स्पर्श केला तर तो दगड एका जिवंत स्त्री मध्ये बदलला..! आणि त्यांचं नाव नुसतं जर दगडावर लिहिलं तर दगड पाण्यावर तरंगतो..!
पाद्री बाबा गप…! 😷
पण त्याचा प्रयत्न सुरूच होता..!
एक दिवस पाद्री बाबांनी चर्च मधून केक आणला आणि त्या आजींना दिला.! त्याला वाटलं की आजी काहो खाणार नाही, पण आजींनी तो केक खाल्ला..! आता पाद्री बाबांच्या डोळ्यात विजयाच हसू होत.! मोठ्या गर्वान त्यानं आजीला म्हटलं की आजी तुम्ही चर्च चा प्रसाद खाल्लात.! तुम्ही आता ख्रिश्चन झालात.!
आजी त्याला मूर्खांत काढणारं हसू हसल्या आणि म्हटल्या.., अरे बावळटा, मला एक दिवस केक दिलास आणि मी तो एकदाच खाल्ला, तर मी ख्रिश्चन झाले का ? आणि मी जे रोज तुला माझ्या घरचं जेवायला घालते आहे तर तू ते खाऊन हिंदू झालास ना आधी..!
पाद्री बाबांनी तोंड काळं केलं आणि ते परत दिसलेच नाहीत.!
आपल्या धर्माबद्दल एव्हढी निष्ठा असणाऱ्या त्या आजी होत्या, आसामच्या सुप्रसिद्ध क्रांतीकारी #कमलादेवीहजारीका..!
आपल्याला कोणालाच माहीत नाहीत त्या..! आसाम पुरत्याच मर्यादित राहिल्या त्या.!
त्यांच्या सारखा विचार जर प्रत्येक हिंदूनी केला असता तर बळजबरीने बाटवलेले आपले बरेच हिंदू परत घरी येऊ शकले असते.! पण आपण तसा विचार नाही केला.!
माझ्या माहितीप्रमाणे, असा विचार करणारे फक्त दोनच हिंदू होते.! नुसता विचार नाही तर प्रत्यक्ष आपल्या आचरणाने ते त्यांनी दाखवून दिलं..! अत्यन्त तेजस्वी हिंदू धर्माभिमानी आणि प्रखर राष्ट्र निष्ठा असणारे.!
एक म्हणजे श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि दुसरे आदरणीय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर….!
©️ आनंद कुलकर्णी