Posted in राजनीति भारत की - Rajniti Bharat ki

अरविंद केजरीवाल आणि कंपनी

भारताचे सार्वभौमत्व संपवण्यासाठी राजकारणात प्लांट केलेली माणसे

© समीर गोरे

अरविंद केजरीवाल काल तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. आज भारतात या माणसाला ओळखत नाही असा कोणीही नसेल. पण मला आपल्याला 2006 या काळात घेऊन जायचे आहे.
आपल्यापैकी किती जणांनी अरविंद केजरीवाल हे नाव 2006 साली ऐकलं होतं ? कोणीच नसेल, मलातरी अजिबात माहीत नव्हते. पण या माणसाला 2006 साली रोमन मॅगसेसे अवॉर्ड मिळाला होता. आपण म्हणाला कित्येक समाजसेवक आपल्याला माहीत पण नसतात पण अवॉर्ड मिळाल्यावर समजतात. पण हा रोमन मॅगसेसे अवॉर्ड या केजरीवाल ला कशासाठी मिळाला जे जेव्हा तुम्हाला समजेल तेंव्हा तुमच्या पायाखालची जमीन पहिल्यांदा सरकेल.

या केजरीवाल ला अवॉर्ड Emerging Leadership in india या साठी मिळाला होता. लागला का पहिला शॉक ? ज्या माणसाला आपण ओळखत पण नाही त्याला लिडरशीप साठी आशिया चे नोबेल समजले जाणारे अवॉर्ड कसे मिळाले ? इथूनच या कहाणीची सुरवात आहे.
सर्वप्रथम हा रोमन मॅगसेसे अवॉर्ड काय आहे? तो कोणाला दिला जातो ? यात अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयए चा संबंध काय हे तुम्हाला खालच्या लिंकमध्ये समजेल.

Ramon Magsaysay Award: Established by two CIA linked American organisations in memory of a CIA groomed Philippines president

त्यातला एक परिच्छेद खालील प्रमाणे

President Magsaysay died in a plane crash in 1957, and the Ramon Magsaysay Award was established in his memory. It may be noted that the award was constituted by New York-based Rockefeller Brothers Fund. In 2000, Ramon Magsaysay Emergent Leadership Award was established by Ford Foundation, another American organisation. Both these organisations are known for working for American interests in foreign countries, and have a history of closely working with the CIA. In fact, the Ford Foundation is alleged to be a philanthropic facade of the Central Intelligence Agency.

आता आपण परत येऊ या केजरीवाल वर. केजरीवाल आणि सिसोदिया यांची कबीर नावाची एक एनजीओ होती ज्याला याच फोर्ड फाउंडेशन ने प्रचंड पैसा पुरवला. अशाच अनेक एनजीओ चे त्यावेळचे मालक आठवा, काही नावं मी सांगतो ज्यांना ह्या फोर्ड फाउंडेशन ने पैसे दिले. तिस्ता सेटलवाड, योगेंद्र यादव, मीरा सान्याल, मल्लिका साराभाई, अमर्त्य सेन, मेधा पाटकर, या सगळ्यांना फोर्ड फाउंडेशन ने लाखो करोडो डॉलर्सची मदत केली आहे आणि काहींना मॅगसेसे अवॉर्ड पण मिळाले आहेत. या बद्दलची एक लिंक खाली देत आहे ती पण नक्की बघा

https://m.facebook.com/notes/surajit-dasgupta/the-cia-ford-ngo-congress-nac-aap-nexus/10152395314509630/

आता 2006 ला अमेरिकेला भारत अशांत करण्यात काय फायदा होता तर तेव्हा भारत परत एकदा द्विपक्षीय राजनीतिकडे चालला होता. भाजप हरली तरी काँग्रेस जिंकली होती आणि सत्तेचा खेळ या दोन राष्ट्रीय पक्षात खेळला जाऊ लागला होता. दोन्ही पक्षांच्या इकॉनॉमिक पोलिसीज जवळपास सारख्याच होत्या आणि त्यामुळे भारत झपाट्याने विकसित होऊ लागला होता. त्या काळात 10℅ जीडीपी ग्रोथ आपल्या आवाक्यात आली होती. भारत पाकिस्तान संबंध चांगले होऊ लागले होते. त्यामुळेच अमेरिकेच्या पोटात दुखणे सहाजिकच होते. म्हणूनच ही वर दिलेली फौज पैसे देऊन बनवली गेली आणि त्या फौजेचा म्होरक्या बनवला अण्णा हजारे

आता येऊ अण्णा आंदोलन वर. अण्णा हजारे असाच एक एनजीओ वाला. ज्याला महाराष्ट्रा बाहेर कोणी ओळखत नव्हते तो उपोषणाला काय बसतो, स्टेज वर हे सगळे फोर्ड फाउंडेशन चे पोसलेले कावळे अवतरतात, मीडिया ला अमाप पैसा वाटला जातो आणि 28 न्यूज चॅनल त्या अण्णा आंदोलनाचे लाईव्ह प्रक्षेपण 15 दिवस करतात. कोणाच्याच मनात शंकेची पाल कशी चुकचुकली नाही ? अण्णा देशाचा नेता बनलाच कसा ज्याला त्याच्या महाराष्ट्रात कोणी विचारत नव्हते. केजरीवाल, सिसोदिया, किरण बेदी, प्रशांत भूषण आणि त्याचा बाप डायरेक्ट स्टेजवर पोचलेच कसे ? केंद्र सरकारने यांना लोकपाल कायदा बनवताना बोलावलेच कसे ? असे अनेक अनुत्तरित प्रष्ण आहेत. पण या सर्व प्रकारामुळे केंद्रातील तेव्हाचे सरकार अस्थिर झाले आणि करप्शन प्रचंड वाढले.
या अण्णा आंदोलन वाल्यांनी परदेशातून आणि इथे आंदोलनाला जमणाऱ्या लोकांच्या कडून जे पैसे जमा केले होते त्या पैशावरून अण्णा आणि केजरीवाल यांच्यात भांडणे झाली. पैसे अण्णांच्या नावावर जमा केले होते म्हणून अण्णांनी 125 कोटी केजरीवाल कडे मागितले आणि ह्या मिटिंगचे किरण बेदीच्या घरी व्हिडीओ रेकॉर्डिंग (स्टिंग ऑपरेशन) करून अण्णांना ब्लॅकमेल केले गेले. याची लिंक

https://dai.ly/x55vwwi

आता अण्णांचा पत्ता कट होता. अ टिपिकल युझ अँड थ्रो केस. आजची अण्णांची परिस्थिती काय आहे ? त्यांनी कितीही घासले तरी ते पुन्हा आंदोलन करू शकत नाहीत, त्यांना जनता आणि मीडिया कोणीही किंमत देत नाहीत.

अरविंद चे सहकारी प्रशांत भूषण याचे काश्मीर बद्दल विधान आठवा, आठवत नसेल तर ही लिंक बघा

काश्मीर बद्दल कोणत्याही काँग्रेसी ने पण असे विधान केलेले नाही. अफझल गुरू ला फाशी पासून वाचवायला रात्री सुप्रीम कोर्ट उघडायला लावणारा पण हाच भूषण आहे.
आता या आपला येणारा जो पैसा आहे त्याचा मेजर स्रोत हा खलिस्तान चळवळी च्या लोकांच्या कडून आहे. याबद्दल आलेली बातमी

https://www.financialexpress.com/india-news/bjp-congress-attack-arvind-kejriwal-after-sting-operation-claims-pro-khalistan-front-funded-aap-during-punjab-elections/1338269/

यावर झालेले स्टिंग ऑपरेशन

https://www.republicworld.com/india-news/general-news/watch-after-stung-khalistan-terror-support-group-talks-about-aap-funding-manish-sisodia-abuses-republic-tv-on-being-asked-a-question.html

आणि सर्वात महत्वाचे की अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया जेव्हा परदेशात फंड गोळा करायला गेलेत तेव्हा ते खलिस्तान चळवळीच्या लोकांच्या घरात राहिले आहेत.
ही त्याची लिंक

https://www.indiatoday.in/assembly-elections-2017/punjab-assembly-election-2017/story/punjab-polls-arvind-kejriwal-khalistani-terrorist-house-957933-2017-01-30

या खलिस्तानी आणि मिशनरी च्या पाठिंब्यावर आप पंजाब आणि गोव्यात पसरली. आता आपण म्हणाल मिशनरी यात कुठून आले. तर फोर्ड फाउंडेशन पासून ते मॅगसेसे अवॉर्ड ते अण्णा आंदोलन यात मिशनरी होतेच याचं आणिक एक प्रूफ देतो.
जेव्हा मदर तेरेसा ना सेंट हा सन्मान दिला गेला तेव्हा भारताच्या परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज उपस्थित होत्या पण तिथे बोलावले गेलेल्यांमध्ये बंगालचा मुख्यमंत्री आणि केजरीवाल होता. त्याची लिंक

https://www.indiatoday.in/india/story/arvind-kejriwal-to-attend-mother-teresa-sainthood-ceremony-in-vatican-331578-2016-07-27

पंजाब मध्ये जेव्हा हे प्रचार करत होते तेव्हा त्यांच्या सुखबिर सिंग खैरा ने उघडपणे रेफ़्रेंडम 2020 या खलिस्तानी अजेंड्याला सपोर्ट केला होता. त्याची लिंक

https://m.hindustantimes.com/punjab/khaira-s-support-to-referendum-2020-lands-aap-in-a-mess-again/story-sl1HWuXFwxeJDEIhR6xkWM.html

आता सर्वात शेवटचे आणि सर्वात भयानक. आपल्याला आठवत असेल तर अण्णाला उपोषणाला बसवून हे सर्व चोर रोज सरकार ने बनवलेल्या लोकपाल कमिटी मध्ये मिटिंग ला जायचे आणि काही खुसपट काढून मिटिंग फेल व्हायची. तेव्हा यांना मार्ग निघणे अभिप्रेत नव्हतेच फक्त हा विषय मोठा करून देशात आग लावायची होती. आणि त्या साठी त्यांनी अनेक मौलवींना हाताशी धरून दिल्लीत इजिप्त च्या तेहरीर स्क्वेअर सारखे आंदोलन करून भारतात क्रांती आणायची होती आणि हे आहे त्याचे प्रूफ

आता तुम्हीच ठरवा हा केजरीवाल देशप्रेमी आहे, देशद्रोही आहे, का कोण आहे.

I rest my case here.

Thanks for reading

समीर गोरे

Author:

Buy, sell, exchange books

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s