Posted in मातृदेवो भव:

सासरी न सांगता कण कण काम करणाऱ्या , आपण माहेरी असल्यावर प्रत्येक वेळी आईने सांगितलेलं काम कस झिडकारत होतो …हे मात्र लग्न झाल्यावर क्षणोक्षणी आठवत राहत. 😶

कस जगतो आपण… गुर्मीत😛चक्क.. “मी नाही करत.. ते काम मला कंटाळा आला बरं,” अस म्हणून सोडून पळून जातो मैत्रिणिकडे गप्पा ठोकायला… 😢

आई नी जर फक्त,” चहा टाक म्हटलं .. तर 100 कारण सांगून चहा न करणाऱ्या आपण सासरी 100 वेळी हसत मुखाने चहा करतो… 😃 ❤

जर कधी एखाद्या वेळी काम थोडं जास्त झालं आणि हात पाय दुखतात तेव्हा आईची सहजच आठवण येऊन जाते,कारण एखादेवेळी ती पण म्हणलेली आठवते ,”थोडे हात चेपून दे ग..! ” पण तेव्हा तितकं आपण मनावर घेत नाही आणि 1,2 मिनिटं चेपून बाजूला होतो… 😶

आज अस वाटतंय की माहेरी गेल्यावर पण आईने न सांगता तिला आपण 1 कप चहा करून द्यावा, तिला आयतं जेवायला द्यावं.. नसतील तिचे हात पाय दुखंत तरी चेपून द्यावे… 😔
पण शेवटी ती आईच ना,तिला वाटतं लेकरू 2 दिवस माहेरी आलंय आणि तिला काय काम करू द्यायचं नाही, ती नाहीच करू देत.. उलट आपण गेलं की नवं नवीन करून खायला घालेल मांडीवर घेऊन थोपटेल. 😇😇

सर्व आई खरच ग्रेटचं असतात.-😊😊😘😘😘
खूप काही असे अनुभव असतात आणि एखाद्या picture सारखे समोर येत राहतात. 😊

#लव युआई😘😘😘😘😘

.

Author:

Buy, sell, exchange old books

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s