।।श्रीराम।।
अयोध्येमध्ये ज्यावेळी पुत्रकामेष्ठी यज्ञ करण्याचे दशरथ राजांनी ठरविले।तेव्हा विभांडक् ऋषिंचा मुलगा ऋष्यशृंग याला पाचारण केले।त्याने जेव्हा अयोध्या नगरीत प्रवेश केला तेव्हा खूप पर्जन्यवृष्टी झाली।त्यावेळी अयोध्येत सुद्धा पावसाचे दुर्भिक्ष्य होते।म्हणून तेव्हा पासून रूढी पडून गेली की पाऊस पडत नसेल तर त्याची स्तुती असलेला श्र्लोक सगळी जनता म्हणायला लागली।तेव्हा सगळयांना विनंती अशी की पुढे तो श्र्लोक देत आहे त्याचा आजपासून आपण सगळयांनी व आपल्या मित्र परिवाराला जप करण्याची विनंती करावी।आता परीस्थीती तशीच निर्माण झाली आहे की पाऊस पडणे खूप गरजेचे आहे म्हणून कृपया सहकार्य करावे ही विनंती।
ऋष्यशृंगाय मुनये विभांडक् सुतायच।
नमः शांताधिपतये सदयसद् वृष्टी हेतवे।।