Posted in छोटी कहानिया - १०,००० से ज्यादा रोचक और प्रेरणात्मक

🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃

एका संन्याशाचे ‘वैभव’…

एका राज्यात एक संन्यासी रहात होता. गावाबाहेर एका मंदिरात रहायचे, येणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करायचे, मंदिराची आणि गावाची सेवा करायची आणि मिळेल त्यात गुजराण करायची असा त्याचा नित्यक्रम होता.

एकदा त्या राज्याचा राजा त्या बाजूने एका मोहिमेवर जात होता. त्याने या संन्याशाबद्दल ऐकले आणि त्याला भेटण्यासाठी तो त्या मंदिरात गेला.

संन्याशाने राजाचे यथोचित आदरातिथ्य केले आणि राजाला मार्गदर्शन केले. राजा पुढे मोहिमेवर गेला आणि त्यात त्याला खूप मोठे यश मिळाले. हे यश संन्याशाच्या मार्गदर्शनामुळे मिळाले म्हणून राजाचा त्याच्यावर प्रचंड विश्वास बसला. माघारी जाताना तो पुन्हा मंदिरात गेला आणि संन्याशाला राजवाड्यात वास्तव्यास येण्याची विनंती केली.

संन्याशी म्हणाला, “आम्ही संन्याशी लोक, आम्हाला काय करायचंय राजवैभव. आम्ही इथेच ठीक आहोत.”

परंतु राजा म्हणाला, “महाराज, आम्हाला, राज्याला आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे. राज्याच्या कल्याणासाठी आपण आमच्यासोबत चलावे.”

अखेर संन्याशी तयार झाला आणि राजासोबत महालात रहायला गेला.

राजाचा राजवाडाच तो, तिथे काय कमी? संन्याशाला स्वतंत्र महाल देण्यात आला. उंची वस्त्रे, रेशमी बिछाने, गालिचे, सोन्याचांदीची भांडी, पंचपक्वाने कशाकशाची कमी नव्हती.

संन्याशाचा आता ‘राज ऋषी’ झाला. महालात रहात असताना पण त्याची नित्यकर्मे सुरूच होती. आणि बैठकीत तो राजाला कारभाराबाबत सल्ले द्यायचा.

पण झालं असं की त्याच्या सोबत इतर जे संन्याशी होते, त्यांचा जळफळाट होऊ लागला. त्यांना या वैभवाची लालसा होती, पण त्यांना ते मिळत नव्हते.

एके दिवशी ते सगळे त्या संन्याशाच्या महालात गेले. संन्याशी आसनावर बसून काहीतरी वाचन करत होता. त्याने त्या सर्वांना बसायला सांगितले, आदरातिथ्य केले.

भेटीला गेलेल्या संन्याशांच्या म्होरक्याने त्यास विचारले, “काय रे, तू तर विरक्तीच्या मोठ्या मोठ्या बाता मारत होतास. ‘माझे जीवन मी परमेश्वराला दिले आहे’ असे सांगत होतास. आणि इथे मात्र चैन करतो आहेस. आता तुला विरक्ती नाही का आठवत?”

हे ऐकून संन्याशी मंद हसला. आपल्या आसनावरून उठला आणि सर्वांना म्हणाला, “चला माझ्यासोबत.”

सर्वजण आपल्या जागेवरून उठले आणि कुतूहलाने संन्याशाच्या मागे जाऊ लागले. चालत चालत ते सर्वजण महालाबाहेर आले, गावाबाहेर आले, लोकवस्ती संपून जंगल सुरू झाले… मग मात्र एकेकाचा धीर सुटायला लागला.

एकाने विचारले, “अरे इकडे कुठे नेतोयस आम्हाला?”

संन्याशी म्हणाला, “आपण देवाकडे जातोय.”

दुसरा म्हणाला, “अरे, पण आपण इकडे रहाणार कुठं, खाणार काय? आणि आमची झोळी, ती तर तिकडे महालातच राहिली, ती तरी घेतली असती…”

तेव्हा संन्याशी म्हणाला, “बंधुनो, मी माझा महाल, माझे वैभव सोडून आलो… तुम्हाला तुमची झोळी सुद्धा सोडवत नाही?? आता तुम्हीच सांगा आसक्ती कुणाला आहे आणि विरक्त कोण आहे? लोभी कोण आहे आणि योगी कोण आहे?”

“माझ्याकडे जे आहे, ते मी माझे म्हणून उपभोगत नाही, तर मी ज्या स्थानावर आहे त्याची गरज म्हणून वापरतो आहे. मला याचा जराही लोभ नाही.”

हे ऐकून त्या सर्व संन्याशाना त्यांची चूक लक्षात आली.


गोष्ट पहिली तर अगदी साधी…

एखाद्या लहान मुलाला ऐकवावी अशी…

पण आज ती सर्वांना सांगायची गरज आहे ती यासाठी की, आसक्ती आणि विरक्तीचा विचार करताना आपली गफलत होऊ नये.

देशहिताचा विचार करताना ‘मोदी’ नावाचा संन्याशी, स्थानाची प्रतिष्ठा राखण्यासाठी वैभव वापरितही असेल, पण ते विरक्तपणे… परंतु जे त्यांच्या नावाने अखंड टोळ्या जमवून शिमगा करतात, त्यांचे हेतू आपण ओळखायला हवेत.

उद्या जर या संन्याशाला आपण हाकलून दिले, तर तो सहजच निघूनही जाईल… त्याला त्याचा काही खेद नसेल, परंतु तो गेल्यावर संधीसाधू लांडग्यांची जी लचकेतोड सुरू होईल, त्याचे काय? याचा आपण विचार करायला हवा.

अधिक काय लिहावे??

— डॉ. मनोहर देशमुख


Author:

Buy, sell, exchange old books

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s