Posted in Uncategorized

शिवसेना


​खरोखर शिवसेना मराठ्यांची आहे का? 

१९६६ ला शिवसेनेची स्थापना झाली. असे म्हणले जाते की मुंबईत मराठी माणूस शिवसेनेमुळे आहे. खरेतर १९६६ पूर्वी मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी ही ७९% होती तर मारवाडी, परप्रांतीय व इतर यांची संख्या ही २१% होती. सध्या २०११ चा जनगनना टक्केवारी नुसार मुंबईतील मराठी

 टक्का हा ६१ टक्के इतका खाली आला म्हणजे मागील ५० वर्षात मराठी टक्का हा तब्बल १८ टक्क्यांनी कमी आला मग मुंबईत मराठी माणूस उत्तरोत्तर कसा कमी झाला? आणि मग शिवसेनेमुळे मराठी माणूस मुंबईत आहे हे कसे सिद्ध होईल?

यानिमित्ताने बरेच प्रश्न उपस्थित होतात

 १ शिवसेनेतील शिव या शब्दाचा अर्थ शंकर कि शिवाजी महाराज ?

२ जर शिव या शब्दाचा अर्थ शिवाजी महाराज असेल तर शिवसेना भवन वर शिवाजी महाराजांचा फोटो का नाही?

३ जर शिव या शब्दाचा अर्थ शिवाजी महाराज असेल तर शिवसेना प्रचार पत्रकात महाराजांचा फोटो का नाही?

४ जर शिव या शब्दाचा अर्थ शिवाजी महाराज असेल तर दसरा मेळाव्यात महाराजांचा फ्लेक्स का नसतो?

५ शासकीय शिवजयंती ला सामना पेपर मध्ये महाराजांना अभिवादन का केले जात नाही.

६ वडापाव सारख्या क्षुल्लक पदार्थास शिवाजी महाराजांचे नाव का दिले (शिव वडा). तुमच्या नावाने का काढत नाही उदा. बाळ वडा, उद्धव भजी, आदित्य पापडी , सामोसा इत्यादी.

७ बाळासाहेब यांची जयंती तारखेनुसार करत आहेत तर महाराजांची तिथीनुसार का?

८ यांच्या घरात कोणाचाही नावात शिव हा शब्द का नाही?

९ शिवजयंती ला उद्धव कधी शिवनेरीवर का जात नाहीत?

१० शिवसेनेचा इतिहासात विधान परिषदेवर किती मराठा आमदार घेतलेत?

११ शिवसेनेने आजपर्यंत केलेल्या आंदोलनात किती ब्राह्मण आणि किती मराठे तुरुंगात गेलेत याची गुणोत्तर व प्रमाण काय?

१२ शिवसेने चे मराठा आमदार किती? मग त्या पटीमध्ये मंत्रीपदे का नाहीत?

१३ मुख्यमंत्री पदावर सर्व प्रथम जोशीच कसे?

१४ जेम्स लेन प्रकरणात बहूलकराची माफी का मागितली?

१५ वादग्रस्त लेखन असताना पुरंदरचे च्या पुरस्काराचे समर्थन का केले?

१६ काँग्रेस व राष्ट्रवादीच्या घराणेशाही वर आगपाखड करताना स्वतःच्या आदित्य ला कसे काय पुढे करतात? ही घराणेशाही नाही काय?

१७ कोंडदेव पुतळा लाल महालातून काढला त्या वेळेस पुणे महापालिकेच्या अखत्यारीतील छत्रपती शिवाजी सभागृहातील महाराजांची प्रतिमा कोणी फोडली?

१८ भगवा झेंडा हा शिवसेनेने आधी वापरला की महाराजांनी?

१९ शिवसेनेने आता पर्यंत किती गडकोटांवर स्वच्छता मोहीम अथवा जीर्णोद्धार केला आहे?

२० शिवसेना संभाजी महाराजांची जयंती का साजरी करत नाही?

२१ शिवसेनेला अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांचे की शिवाजी पार्क वरील बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महत्वाचे आहे?

२२ शिवसेना मराठा व्यक्तीस विधान परिषदेवर का घेत नाही?

२३ बेळगाव प्रश्नावर उद्धव बेळगावात जाऊन किती वेळा बोलले?

२४ मुंबई महापौर जागा खुल्या प्रवर्गासाठी ज्या वेळेस आली आहे त्यावेळेस मराठा जातीतील माहापौर का नाही?

२५ ठाकरे कुटुंबीयांनी किती शाळा, ग्रंथालये, महाविद्यालये, क्रीडा संकुले काढली?

२६ शिवाजी महाराजांच्या नावाने एखादा पुरस्कार का काढला नाही?

२७ आदिवासी विकास, बहुजजन समाज या विषयी भूमिका काय?

२८ जैतापूर अनु ऊर्जा प्रकल्पा बद्दल अनिल काकोडकर यांच्या पेक्षा जास्त माहिती तुम्हास आहे का? नासेल तर प्रकल्पास विरोध का?

२९ जैतापूर प्रकल्पामुळे लोड शेडिंग बंद झालास आणि आमच्या बळीराजास २४ तास वीज मिळेल त्यामुळे आपण दुःखी आहात काय?

३० कार्टून प्रकरणात अजून मराठा समाजाची माफी का मागितली नाही? 

या प्रश्नांची उत्तरे तथाकथित शिव सैनिकांनी द्यावीत आणि थोडा विचार करावा.

Sandip Ahire